Video

Video: मरणानंतरही नरक यातना! रस्ता नसल्याने मृतदेह चक्क झोळीतून नेण्याची आली वेळ

447 0

नांदेड : एकीकडे आपला देश प्रगतीच्या दिशेने प्रवास करत असताना आता नांदेडमधून (Video) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह गावकऱ्यांना चक्क झोळी करुण आणावा (Video) लागला. किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गावाला रस्ता नसल्यामुळे मृतदेह झोळीतून नेण्याची वेळ आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
जगदंबा तांडा येथे 25 ते 30 कुटूंबांची लोकवस्ती आहे. शेतकरी, शेतमजुर अशी या तांड्याची ओळख आहे. तिथे संतोष चव्हाण या युवकाचा मृत्यू झाला होता. रस्ताअभावी गावकऱ्यांना झोळी करुण त्याचा मृतदेह गावात आणावा लागला. शिवाय अंत्यविधीसाठी देखील मृतदेह झोळीतून नेण्यात आला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

यापूर्वी तांडावासियांनी गावातील रस्ता करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु, दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!