Acharya Dhirendra Shastri

Acharya Dhirendra Shastri : आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेदरम्यान मुलीला बॅरिकेडवरून फेकलं; Video व्हायरल

304 0

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Acharya Dhirendra Shastri) यांच्या ग्रेटर नोएडा येथील कथेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री (Acharya Dhirendra Shastri) यांची कथा ऐकण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोकांनी एका मुलीला बॅरिकेडच्या पलीकडे उचलून फेकल्याचे दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये आचार्य धीरेंद्र शास्त्री (Acharya Dhirendra Shastri) व्यासपीठावर बसल्याचे दिसत आहेत, यावेळी एक मुलगी बॅरिकेड ओलांडताना दिसत आहे. मुलीने बॅरिकेड ओलांडताच तिथे उपस्थित एक व्यक्ती त्या मुलीच्या जवळ येतो आणि तिला उचलून थेट बॅरिकेडच्या पलीकडे फेकतो. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी तिथे काही पोलिसही उपस्थित असल्याचे दिसत आहेत. मात्र, ते काहीही करताना दिसत नाही आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Murder Mystery : दोन मुलं अन् आईच्या मृतदेहाचं 2 वर्षांनी गूढ उकललं; काय होतं नेमकं प्रकरण?

Train Viral Video : महिलांची लोकल ट्रेनमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; लाथा- बुक्क्यांनी केली मारहाण

संजय त्रिपाठी नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं आहे, “कचऱ्याच्या पोत्याप्रमाणे एका मुलीला बॅरिकेडच्या पलीकडे फेकले जात आहे. धन्य आहेत आचार्य धीरेंद्र शास्त्री, ज्यांच्यासमोर त्यांचे गुंड असे कृत्य करत आहेत. या मुलीने कोणती चूक केली होती, म्हणून तिला अशी शिक्षा दिली? आता कुठे आहेत ठेकेदार? आहे का काही उत्तर? अश्या प्रकारच्या कमेंट लोकांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!