ठाणे : राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण (Murder Mystery) खूप वाढले आहे. मीरारोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी एका मृत महिलेवर तिच्याच दोन मुलांची हत्या केल्याचा गुन्हा (Murder Mystery)दाखल केला आहे. 2 वर्षांपूर्वी मीरा रोड या ठिकाणी एक महिला तिच्या दोन मुलांसह मृतावस्थेमध्ये आढळून आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणी 2 वर्षांनंतर मृत महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आईवरच खुनाचा गुन्हा दाखल केल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Acid Attack : लग्न मोडल्यामुळे संतप्त होऊन आरोपीचे झोपलेल्या तरुणीसोबत ‘हे’ संतापजनक कृत्य
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार नसरीन वाघू (47), आणि तिची दोन मुले, सदनाज (20) आणि हर्ष (13), 7 सप्टेंबर 2021 रोजी नया नगर परिसरातील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला पण त्यांना यामध्ये काही आढळून आले नाही. पोलिसांनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले होते.
Bhimashankar Accident : भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली गावाजवळ अपघात; 5 जण जखमी
या मृतदेहांचे आता अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये असे दिसून आले कि, नसरीनच्या मुलांचा गळा दाबला गेला होता आणि तिने आपले जीवन संपवण्यासाठी काही गोळ्या घेतल्या होत्या. यामुळे तिघांचा मृत्यू झाला.तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.