Video

VIDEO: धबधब्यावर रील बनवताना तरुणाचा पाय घसरला; शेवटचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

4048 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पावसाळा सुरु आहे. सगळेजण या पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. या पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. ह्यामध्ये काही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता भलतेच धाडस करताना दिसत आहेत. असेच धाडस करणे एका तरुणाच्या अंगलट आले. रील बनवत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो धबधब्यामध्ये वाहून गेला. यानंतर या तरुणाचं काय झालं याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

काय आहे व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या धबाधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे, यावेळी धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका दगडावर हा तरुण उभा आहे. तो या धबधब्याच्या बाजूला रिल शूट करत आहे, यावेळी तो हालचाल करताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात त्या दगडावर पडतो आणि वाहून जातो. यानंतर त्याचा मित्र त्याच्याडे धाव घेतो. यानंतर या तरुणाचं काय झालं याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेकजण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या जीवाला मुकतात. कधी व्हिडिओ तर कधी सेल्फीच्या नादात अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकांनी नसते धाडस करू नये असे पोलीस आणि प्रशासन वारंवार सांगत असतात.

Share This News

Related Post

Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! घरी कोणी नसल्याची संधी साधत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - September 12, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) मी जीवनात अयशस्वी झाल्याने मी आत्महत्या…
Hanjala Adnan

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कराचीमध्ये मोस्ट वाँटेड असणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान (Hanjala Adnan) याची हत्या करण्यात आली आहे.…

उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधात मोर्चा

Posted by - May 10, 2022 0
नवाबगंज- उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते…

BIG NEWS : तुर्कीत कोळसा खाणीत स्फोट; 14 कामगारांचा मृत्यू; 49 कामगार अजूनही अडकले खाणीत

Posted by - October 15, 2022 0
तुर्की : शुक्रवारी तुर्कीमध्ये कोळसा खाणीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 14 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 28…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Posted by - January 15, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची (Sharad Mohol Murder) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *