” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…!” ट्विट करून समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी ; वाचा सविस्तर प्रकरण

406 0

मुंबई : समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे . ” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…! ” असे ट्विट करून संबंधित व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले . याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे .

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , अमन नावाच्या ट्विटर अकाउंट वरून समीर वानखेडे यांना ही धमकी देण्यात आली आहे . या व्यक्तीने वानखेडे यांना टॅग करून ‘ जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील ‘ असा धमकीचा संदेश दिला आहे. त्यानंतर या युजरने ट्विट डिलीट देखील केले आहे . याबाबत पोलीस अधिक तपास करत असून हे अकाउंट त्याच दिवशी बनवण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान नवाब मलिक यांच्या विरोधात एफ. आय. आर दाखल केल्या नंतर वानखेडे यांना अशा धमक्या येत असल्याचे समजते . नवाब मलिक यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी मिळवल्याचा त्यांनी आरोप केला होता . तसेच कोरडिलिया क्रूझ प्रकरणामुळे देखील त्यांच्या नावाची चर्चा गाजली होती.

Share This News
error: Content is protected !!