suicide

CRIME NEWS : प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी… पाहा VIDEO

291 0

ठाणे : ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यातील हद्दीत एका तरुणानं राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून या तरुणानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं असून आत्महत्येपूर्वी तशा आशयाची एक चिठ्ठी त्यानं लिहून ठेवल्याचं आढळून आलं आहे.

“आपण प्रेयसीमुळे कर्जबाजारी झालो असून पैशांचीमागणी केल्यानंतर प्रेयसीकडून वारंवार पोलिसांची धमकी दिली जात होती आणि याच नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचं या चिट्ठीत नमूद करण्यात आलंय. या चिठ्ठीत त्यानं प्रेयसीचं नावही नमूद केलं आहे. या प्रकरणी प्रियकराच्या आईच्या फिर्यादीवरून आणि मिळालेल्या चिठ्ठीवरून कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ठाण्यातील रमाबाई आंबेडकर सोसायटी, कळवा येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विक्रम मोरे या तरुणाचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबध होते. विक्रमनं प्रेयसीच्या मागणीवरून एका खाजगी फायनान्स कंपनीतून कर्ज घेतलं होतं. मात्र काही महिने कर्जफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीनं त्याच्यामागं कर्जफेडीचा तगादा लावला होता.

ही बाब विक्रमनं प्रेयसीच्या लक्षात आणून देत तिला पैसे फेडण्यासाठी सांगितलं मात्र तिनं याप्रकरणी टाळाटाळ सुरू केली आणि विक्रमलाच पोलिसांची धमकी देऊ लागली. अखेर आपल्यावरील दबाव आणि नैराश्यातून विक्रम मोरे यान राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. 13 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेला विक्रम एका खाजगी कंपनीत कामास होता.

Share This News

Related Post

एसटी विलीनीकरणाबाबत 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर आज ( दि. 22 मार्च ) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली.…

कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीडिया बनतेय मूलभूत गरज – जवाहर सरकार यांचे प्रतिपादन; एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन

Posted by - November 10, 2022 0
पुणे : “अन्न, वस्त्र, निवारा आणि कनेक्टिव्हीटी या आजच्या काळातील मूलभूत गरजा आहेत. डिजिटल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता ?” दीपक केसरकर यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल

Posted by - December 3, 2022 0
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने नुकतेच महाराष्ट्राला पत्र पाठवून बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पाऊल ठेवून नये असा धमकी वजा इशारा दिला आहे.…

नंदुरबारमध्ये पोलीस अधीक्षकांनी केला स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान

Posted by - September 28, 2022 0
नंदुरबार : नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर परिसरामध्ये यात्रा उत्सव दरम्यान उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्याचा मान जिल्हा पोलीस…

गटनेतेपदी अजय चौधरीच ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची मान्यता, शिंदे गटाला धक्का

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *