POPULAR FRONT OF INDIA : काय आहे वादग्रस्त PFI ?कशी झाली स्थापना, उद्देश वाचा सविस्तर माहिती

301 0

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी पी एफ आय च्या अनेक कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत पुण्यातून दोन सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यामध्ये कयूम शेख आणि रझी अहमद खान या दोघा जणांचा समावेश आहे या दोघांना अटक करून एक पथक नाशिकला रवाना झाला आहे पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहाटेपासून मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली काय आहे पी एफ आय ही संघटना याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

अधिक जाणून घ्या : TOP NEWS MARATHI BREAKING NEWS ! : NIA कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी; पुण्यात कुठे कारवाई सुरू ? पाहा

PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक केरळ मध्ये कार्यरत असणारी कट्टर इस्लामिक संघटना आहे. 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून PFI ची निर्मिती झाली. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली NIA ने तमिळनाडूमधील कोइंबतूर, गुड्डालोर, रामनाथ, दिंडोगल, थिंकासिस यासह अनेक ठिकाणी PFI नेत्यांच्या घराची तपासणी केली आहे. चेन्नई PFI स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम इथेही झाडाझडती घेण्यात आली असून NIA आणि PFI चे अध्यक्ष ओमा सलाम यांच्या मल्लपुरम जिल्ह्यातील मंजेरी या ठिकाणी मध्यरात्रीपासूनच छापे टाकण्यास सुरुवात केली.

Image result for  PFI INDIA

PFI स्वत:चे वर्णन एक नव-सामाजिक चळवळ म्हणून करते, जी लोकांना न्याय, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सक्षम बनविण्यासाठी वचनबद्ध आहे. २०१२ मध्ये केरळ सरकारने असा दावा केला होता की, “पीएफआय म्हणजे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेचे दुसारे स्वरूप आहे. PFI च्या कार्यकर्त्यांन कडून पोलिसांनां घातक शस्त्रे, बॉम्ब, बंदुकीची दारू, तलवारी मिळल्या असून तालिबान, अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!