व्हॅलेंटाईन डे आला की सर्वच जण प्रेमाविषयी बोलतात. पण नेमकं हे प्रेम म्हणजे काय असतं कधी विचार केलाय ? तसं पाहायला गेलं तर आई-वडीलही आपल्यावर प्रेम करत असतात. ते प्रेम अगदी डोळे झाकून असतं. तसंच प्रेम तुम्हीही तुमच्या आई-वडिलांवर करत असतात. मग त्यामध्ये तुमचे आई-बाबा कसे दिसतात ? तुमच्याशी कसं वागतात ? तुम्हाला त्यांनी आजपर्यंत काय दिलं ? किती माया दिली ? हे सगळं त्यामध्ये आपण कदाचित विचार करतो… पण कित्येक वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की घरात खूप वादावादी झाल्या तरी तुमचं तुमच्या आई-वडिलांवरती किंवा तुमच्या आई वडिलांचं तुमच्यावरच प्रेम कधी कमी होत नसतं ते एक प्रेम असतं ! रक्ताचं नातं असतं !
पण जेव्हा वेळ येते तुमच्या लाईफ पार्टनरची, तेव्हा तुम्ही विचार केला आहे का, की हे एक असं नातं आहे जे रक्ताच नाही, पण तरीही तुम्ही त्यात प्रचंड गुंतलेले असता ! मग आता तुमच्या लाईफ पार्टनरच्या बाबत काही गोष्टी सांगते, त्या फक्त तपासून पहा, जर त्या सगळ्या बरोबर असतील तर त्याचं किंवा तिचं तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम आहे …!
१. चारचौघांमध्ये तो किंवा ती नेहमी तुमची बाजू घेतो. तुम्ही चुकीचे असलात तरी तुमच्या बाजूने माफी मागून पुन्हा असं होणार नाही असे देखील तुमच्या वतीने बोलून मोकळा होतो.
२. या नात्यांमध्ये बऱ्याच वेळा पझेसिव्ह पणा खूप असतो. पण त्याचा किंवा तिचा तुमच्यावर खरंच किती विश्वास आहे हे एकदा तपासा , जसं की तुम्ही तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर बोललेलं तिला किंवा त्याला न आवडणं हा एक बालिशपणा आहे. प्रेमामध्ये एकमेकांची स्पेस देखील खूप महत्त्वाची असते. आणि ती केवळ विश्वासच देत असते. त्यामुळे तुमच्या लाइफ पार्टनरचा तुमच्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे.
३. आता व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर तुम्हाला गिफ्ट नक्कीच येणार ! तर ते गिफ्ट काय आलं यावरून सुद्धा तुम्हाला हे लक्षात येईल की तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यावर किती प्रेम करतो, आता तुम्ही म्हणाल की ते किती महागाच आहे, किती मोठं आहे याला महत्त्व आहे का ? तर नाही महत्त्व आहे तुमच्या इच्छा आणि आवडीला… तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला किती ओळखतो यातून जर त्याने तुमची इच्छा स्वतःहून जाणून तुम्हाला काही गिफ्ट दिलं आणि ते तुम्हाला खरंच खूप दिवस झाले हवं होतं, तर तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला खूप मनापासून ओळखतो. गिफ्ट देताना आपल्यालाही पार्टनरला काय आवडेल हा विचार करणं हे देखील प्रेमच आहे.
४. मनमोकळं बोलणं…! एखादी अशी गोष्ट जी फक्त त्या व्यक्तीलाच स्वतः बद्दल माहीत असते, ती देखील तुम्हाला सांगणं, स्वतःहून तुमच्याबरोबर वेळ घालवायला आवडन, तुम्ही दुसऱ्या एखाद्या नात्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या किंवा कमी असं मोजमाप न करता तुमची स्वतंत्र जागा त्याच्या मनात असणं हे देखील प्रेमच आहे.