#CRIME : अंगावर कोट आणि डोक्यावर हेल्मेट घालून करायचे घरफोड्या; मेडिकल दुकानांना टार्गेट करून नशेसाठी चोरायचे सिरप

748 0

मुंबई : पंचवीस घरफोडीचे गुन्हे केलेल्या दोन सराईत भामट्यांना मानपाडा पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. हे दोन्ही आरोपी डोक्यावर हेल्मेट आणि अंगात कोट घालायचे. तर मेडिकल दुकानांना टार्गेट करून नशा करण्यासाठी कोरेक्स सिरपची चोरी करायचे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात या दोघा सराईतांनी 25 घरपोडीचे गुन्हे केले आहेत. मनपा परिसरात चोरी करून पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या या दोघांना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पकडले आहे.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे या आरोपींकडून तब्बल 21 लाख 94 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. यामध्ये सारुद्दीन ताजुद्दीन शेख आणि मोहम्मद जिलानी इशा शहा या दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Share This News
error: Content is protected !!