CM EKNATH SHINDE

सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

353 0

मुंबई : ‘ होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करावेत. होळी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा असे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, होळीचा हा पारंपरिक सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातो. या सणातून पिढ्यान् पिढ्यांना पर्यावरणाचे जतन-संवर्धनाचा शिकवण दिली जाते. यंदाही या सणातून आपल्यामध्ये जागरुकता वाढीस लागणारे उपक्रमांचे आयोजन व्हावे. धुलिवंदनाच्या रंगाची उधळण होते. हे रंग आपल्याला निसर्गाकडेच घेऊन जातात. या रंगा प्रमाणेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परस्पर स्नेह-प्रेमांच्या रंगांची बहार निर्माण व्हावी. या सणांच्या उत्सव-उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हीच मनोकामना.

Share This News

Related Post

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ; मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी

Posted by - January 28, 2022 0
इंदोर – आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या…

गवतावर चालणे : रोज अनवाणी गवतावर चालल्याने मिळेल अनेक आजारांपासून मुक्ती, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Posted by - March 15, 2023 0
सतत बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. याशिवाय बिझी शेड्युलमुळे लोकांच्या शारीरिक हालचालीही लक्षणीय रित्या कमी…

NANA PATOLE : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र !

Posted by - December 5, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात…

अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर तासभर आधीच मुलांना वाटला ! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर

Posted by - March 15, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येते. अहमदनगर मधील एका महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच विद्यार्थ्यांना मिळाला…

ब्रेकिंग न्यूज, उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचे निधन

Posted by - February 12, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *