Vaishali Shinde

Vaishali Shinde : ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

2631 0

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे (Vaishali Shinde) यांचं शुक्रवारी निधन झालं आहे.त्यांनी वयाच्या 62व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता केईम रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घाटकोपरमधील भटवाडी स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे. वैशाली शिंदे यांच्या माघारी एक मुलगा आहे.

वैशाली शिंदे यांना मधुमेहाचा आजार होता. मधुमेह असतानाच शिंदे यांच्या पायाला गँगरीन झालं होतं. केईएम रुग्णालयात त्यांच्यावर गँगरीन उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच वैशाली शिंदे यांची प्राणज्योत मालवली. घाटकोपर येथील भटवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आंबडेकरी चळवळीत मोठं योगदान
गायिका वैशाली शिंदे यांनी त्यांच्या गाण्यांमधून आंबडेकरी चळवळीत मोठं योगदान दिलं होतं. 4 एप्रिल 1962 मध्ये सोलापुरातील मोहोळ तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. वैशाली शिंदे यांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच गाण्याचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे आई – वडील रामचंद्र आणि सरुबाई क्षीरसागर हे दोघंही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी म्हणायचे. यामुळे वैशाली शिंदे यांनाही या गाण्यांची ओढ लागली आणि त्यांनी गायनास सुरुवात केली. वैशाली शिंदे यांच्या जाण्याने आंबडेकरी चळवळीचा आवाज हरपला आहे.

Share This News
error: Content is protected !!