मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी या नवीन शिलेदारांना त्यांची नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे.
कोण आहे युवासेनेचे ‘ते’ 3 शिलेदार ?
युवासेनेच्या कार्याध्यक्षपदी पूर्वेश प्रताप सरनाईक यांची, युवासेना सरचिटणीसपदी राहुल कनाल आणि अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष आणि संघटना तळागाळात पोहचवण्यासह, सरकारच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी नवीन शिलेदारांना नियुक्तीपत्रे देऊन निवड घोषित केली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम हेदेखील उपस्थित होते.