पुणे : लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर,जिल्हा मध्यवर्ती कार्यालय (साधू वासवानी चौक) येथे पक्षाचे संस्थापक पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, सरचिटणीस के.सी. पवार ,लीगल सेल अध्यक्ष एड अमित दरेकर, संतोष पिल्ले,दीपक खुडे,राजेश पिवाल,कुदरत पटेल,मंदार पांचाळ,रणजित सोनवणे आदी उपस्थित होते.
संजय आल्हाट यांनी यावेळी बोलताना पासवान यांच्या ५० वर्षांच्या सामाजिक राजकीय योगदानाची माहिती देऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार मागणी यावेळी करण्यात आली आहे.