Breaking ! मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात, सर्वजण सुखरूप

460 0

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अलिबाग जवळील मांडवा येथे अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उदय सामंत यांच्यासहित बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोट जेट्टीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी उदय सामंत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून स्पीड बोटीने निघाले होते. त्यांच्यासोबत माजी खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि इतर नेते होते.

बोट मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर बोट चालक कॅप्टनने बोट वळवली. पण याचवेळी कॅप्टनचा बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि बोट जेटीच्या खालच्या पिलरला जाऊन धडकली. सुदैवाने यावेळी बोटीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संपूर्ण स्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आल्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही. उदय सामंत सहित सर्वजण हे सुखरुप आहेत. अपघाताची घटना आमदार महेंद्र दळवी आणि त्‍यांचे सहकारी शिवसेनेचे कार्यकर्ते जेटीवरून पाहत होते. आम्‍हीदेखील या प्रकाराने घाबरलो होतो असे आमदार दळवी म्‍हणाले.

विशेष म्हणजे उदय सामंत यांच्यासोबत यापूर्वी देखील स्पीड बोट बंद पडल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. उदय सामंत हे गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. या दरम्यान, अचानक स्पीड बोट बंद पडली. बोटीतील यंत्रणा बंद पडल्याने बोट चालक कॅप्टनला आपात्कालीन संदेश पाठवणंही कठीण झालेलं. पण सामंत यांच्या स्वीय साहाय्यकाने तात्काळ दुसरी बोट बोलावलेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.

Share This News

Related Post

ध्वनी मर्यादेच्या नियमांचे पालन करा ; अन्यथा गुन्हे दाखल करणार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Posted by - September 8, 2022 0
पुणे : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नाही. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसताना पुणेकर गणेशोत्सव अत्यंत उत्साहात…

‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना सवाल

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: ‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी…

#Travel Diary : कमी बजेटमध्ये संस्मरणीय सुट्ट्या घालवायच्या असतील तर ही पर्यटन स्थळे आहेत परफेक्ट

Posted by - March 21, 2023 0
उन्हाळी पर्यटनस्थळे : मार्च महिना येताच उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे लोक सुट्टीचे प्लॅनिंग करू लागतात. पण…

शिवापूर टोल नाका हटवा नाहीतर आमदारांच्या घरासमोर घंटानाद; शिवापूर टोलनाका कृती समितीचा इशारा

Posted by - May 1, 2022 0
शिवापूर येथील टोलनाका हटवण्यासाठी शिवापूर टोलनाका कृती समिती आक्रमक झाली असून या कृती समितीच्या वतीनं पुण्यातील कात्रज चौकात धरणं आंदोलन…

गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ‘ठाकरी तोफ’

Posted by - April 23, 2023 0
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवार (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *