ट्विटरचे मालक ALON MUSK यांची मोठी घोषणा; “CEO पदाची जबाबदारी घेणारा मूर्ख सापडल्यावर…!”

191 0

ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवरून थेट नेटकरांना विचारलं होतं की, “मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का ? तुम्ही सांगाल तसं मी करेन !

त्यानंतर ट्विटरच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. आता त्यांनी पुन्हा एक ट्विट करून मोठी घोषणा केली. यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे की, “मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी लगेच राजीनामा देईन! त्यानंतर मी सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्वर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेल असं त्यांनी म्हटल आहे.

त्यानंतर आता सीएनबीसीच्या मंगळवारी आलेल्या एका अहवालानुसार एलोन मस्क ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत.

Share This News
error: Content is protected !!