अनेक जणांना अशी समस्या असते की कितीही प्रयत्न केले तरी वजन काही कमी होत नाही. आम्ही खूप व्यायाम करतो… कठोर डायट फॉलो करतो… पण वजनावर काही परिणाम दिसूनच येत नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही हलकेफुलके उपाय आज सांगणार आहे ते केवळ त्याच लोकांसाठी आहेत ज्यांना कोणत्या विशिष्ट शारीरिक व्याधीमुळे वजन वाढ होते आहे. हे हलकेफुलके उपाय तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्हाला कोणती शारीरिक व्याधी नसेल.
काही शारीरिक व्याधी अशा असतात की त्यामुळे वजन नियंत्रणात आणणे शक्य होत नाही. काही औषध उपचार यामुळे देखील अतिरिक्त वजन वाढत असते. तसेच जर तुम्ही नुकताच बाळाला जन्म दिला असेल तर लगेचच वजन कमी करण्याच्या मागे लागू नका…
आता असा कोणताही आजार तुम्हाला नसेल , पण केवळ तुमच्या जीवनशैली आणि खानपानाच्या विचित्र सवयींमुळे तुमचे वजन वाढत असेल तर तुम्ही काही गोष्टी आठवणीने रोज करा…
१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठोर डायट करू नका, पण रोज उठून फास्ट फूड खाणे बंद करा.
२. रोज तासभर जिम मध्ये जाऊन व्यायाम करू नका, पण जेवणाच्या वेळा सांभाळा. सकाळचे जेवण पोटभर दहा वाजता, दुपारचे जेवण मध्यम स्वरूपात एक वाजता आणि रात्रीचे जेवण साडेसात वाजता हलकेफुलके करायचे आहे.
३. दिवसभरात भरपूर पाणी प्या. पण जेवण्याच्या वेळेच्या अर्धा तास आधी पाणी पिणे थांबवा. जेवताना गरजेपुरते घोट घोटभर पाणी प्या. आणि जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्या.
४. जेवल्यानंतर लगेच एका जागी बसणे बंद करा. पाच मिनिटे तरी हवं तर घरातच का होईना पण चकरा मारा किंवा ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये चकरा मारा.
५. रात्री कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज अन्न ग्रहण करणे बंद करा. रात्रीचे जेवण हलके करा.
६. रात्रीचे साडेसात वाजताचे हलकेफुलके जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास दुधामध्ये तूप एक चमचा घाला आणि त्याचे सेवन करा. त्याने पोट साफ राहील आणि पचनशक्ती सुधारेल.
७. रोज सकाळी 15 मिनिटं तरी हलकाफुलका व्यायाम करा फिरायला गेले तरीही उत्तम.
८. सगळ्या भाज्या खा ! भात खाल्ल्याने वजन वाढते असे नाही, पण कोणत्याही पदार्थाचे सेवन हे प्रमाणात केले तर तुमच्या शरीराला फायदा होईल. कोणत्याही पदार्थाचे सेवन आवडते. म्हणून अधिक केले तर त्याच्या फायद्याऐवजी नुकसानच शरीराला भोगावे लागेल.
९. त्यामुळे आजपासूनच या अगदी दिवसभरात करायच्या हलक्याफुलक्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे वजन हमखास हळूहळू कमी होईल. आजपासूनच मनावर घ्या !