मेष रास : आज तुम्हाला तुमच्या सवयीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. ही सवय आहे संकटांबाबत सातत्याने चर्चा करणे , आणि त्याचे दडपण घेणे. त्यामुळे आज केवळ संकटाला कसे थोपवता येईल याचा सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला नाही. सहकाऱ्यांसोबत वादविवाद संभवतात. आज मन शांत ठेवा.
वृषभ रास : आज तुम्हाला आर्थिक चणचण येणार आहे. परंतु कुटुंबाचे सहकार्य मिळेल, मित्र देखील मदतीचा हात पुढे करणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आरोग्य सुधारेल
मिथुन रास : जुनाट सर्दी खोकला आज त्रास देणार आहे. आजारपणावर वेळेत औषध घ्या. मद्यपान आणि धूम्रपणाची सवय असेल तर ती पूर्णपणे बंद होण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला.
कर्क रास : आज तुमचा उत्साह शिगेला असेल. पण थोडं मन ताब्यात ठेवा. उत्साहाच्या भरात शब्दांवर नियंत्रण ठेवा. बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
सिंह रास : अनेक दिवसांपासून एखाद्या चिंतेने तुम्हाला ग्रासले आहे. पण आज तुम्हाला पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे. तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील. आज दिवस फक्त आरामासाठीच घालवा. कार्यालयीन सुट्टी घ्या.
कन्या रास : नशिबात जे आहे तेच होईल हे जरी बरोबर असले तरीही तुम्ही प्रयत्न आणि मेहनत करत राहणे आवश्यक असते, हे विसरू नका. तुमची मेहनत पाहूनच परमेश्वर कदाचित नशिबात तुम्हाला हवं ते लिहितो त्यामुळे नशिबावर सगळं काही सोपं होऊ नका तब्येतीकडे लक्ष द्या.
तुळ रास : आर्थिक दृष्ट्या दिवस चांगले. आहेत प्रॉपर्टी घेण्याचा विचार करू शकता. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी देखील दिवस चांगला आहे. तब्येतीकडे लक्ष देऊन मेहनत सुरू राहू द्या.
वृश्चिक रास : तुमची देण्याची वृत्ती ही जर तुमच्या पदरी पुण्य टाकत असेल तरी देताना हात आखाडावा लागेल. आधी घरातल्या गरजा पूर्ण करा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल, नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आज यश मिळेल.
धनु रास : आज मानसिक आरोग्य जपावे लागेल. कार्यालयात कुरबुरीचा दिवस होऊ शकतो. त्यामुळे लहान चुकांकडे दुर्लक्ष करा,कर्मचाऱ्यांशी वाद घालू नका.
मकर रास : तुम्ही नेहमी एखादा निर्णय घेताना चटकन घेता. परंतु आज निर्णय घेताना तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचाही विचार करावा लागणार आहे. कदाचित तुम्ही मित्राला संकटात टाकू शकता. आज कोणताही निर्णय घेऊ नकाच आर्थिक चणचण जाणवेल पण आरोग्य साथ देणार आहे.
कुंभ रास : आज तुम्हाला काहीतरी वेगळा दिवस जगाव वाटेल, बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. आरोग्य उत्तम राहील. मनशांती मिळेल. आशा इच्छा पूर्ण कराल. गृहिणी काहीतरी विशेष बेत आखतील त्यामुळे घरात आज मेजवानी घडणार आहे.
मीन रास : तुमच्या प्रेम संबंधांविषयी घरात माहिती सांगण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. लग्न ठरू शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल, आरोग्य उत्तम राहील. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस साधारण आहे.