“ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे…!” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला ‘हा’ मोठा आदेश

487 0

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असून याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक मोठा आदेश दिला आहे.

मनसैनिकांसाठी एक पत्र जारी करत सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी हे कदापि खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 

माझ्या पक्षातील कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला माझ्याशी बोला पण हे सगळं सोडून थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरड ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या मग काय घाण करायची आहे ती करा पक्षात राहून असे प्रकार केले तर हकालपट्टी अटळ आहे असे देखील राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

समज नाही तर अंतिम ताकीद आहे.

शेवटी ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना खडे बोल सुनावले आहेत

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेले पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष शहराध्यक्ष वसंत मोरे पुण्यातील कोअर कमिटीवर सातत्यानं नाराज असल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे हे पत्र वसंत मोरे यांच्यासाठी आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Share This News

Related Post

पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

Posted by - March 31, 2022 0
पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप…
Mumbai Airport

गेल्या 12 तासांपासून मुंबई एअरपोर्टवर अडकले 300हून अधिक प्रवासी

Posted by - May 26, 2023 0
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले…
Hardeepsingh Nijjar

Hardeep Singh Nijjar : कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

Posted by - June 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची…
BJP

विधानसभेसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती; कोणत्या नेत्यांचा झाला समितीत समावेश?

Posted by - September 10, 2024 0
लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून व्यवस्थापन समिती…

आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Posted by - April 17, 2022 0
वेगवेगळ्या कल्पनाशक्तींचे कौतुक करणारे उद्योगपती म्हणून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख सर्वश्रुत आहे. उद्योग-व्यवसाय वाढवण्याच्या अनोख्या, डोकेबाज कल्पनांचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *