सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

407 0

महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास 360 कोटी मिळत होते . ते आता केवळ शंभर कोटी निधी मिळत असल्याने 200 कोटी रुपयाचा मोठा प्रश्न एसटी महामंडळासमोर आहे.

अधिक वाचा : सरदार पटेलांच्या निजामावरील पोलिस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची कश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत – एकनाथ शिंदे 

सामान्यतः एसटी महामंडळ चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारांकरिता 310 कोटी रुपये लागतात. 250 कोटी रुपयांचा खर्च येतो तो इंधनावर आणि इतर व्यवस्थापनासाठी सामान्यतः 90 कोटी रुपये खर्च होतो. अर्थातच एकूण 650 कोटी रुपये महिना खर्च एसटी महामंडळास येतो आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न हे प्रति महिना 450 कोटी रुपये आहे. त्यात आता सरकारकडून 360 कोटींऐवजी केवळ शंभर कोटी रुपये निधी मिळत असल्याने 200 कोटी आणायचे कुठून असा प्रश्न एसटी महामंडळासमोर आव्हान घेऊन उभा आहे.

अधिक वाचा : दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाला BKC मैदानात मिळाली परवानगी 

परिणामी एसटी महामंडळाने दोन महिन्यांपासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हप्ता जमा केला नाहीये. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!