पुणे : आज सकाळी १० वाजता हडपसर, भिमनगर-शिंदेवाडी येथील जुना कालवा या ठिकाणी एक चारचाकी वाहन पडल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळताच, हडपसर अग्निशमन केंद्राकडून तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी जवान पोहोचताच वाहनचालक,मालक यांच्या मिञाकडून व पोलिसांसमक्ष मिळालेल्या माहितीनुसार, सदर चारचाकी वाहन हे काल मध्यराञी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते कालव्यात पडले होते. वाहनामधे वाहनचालक व अजून एक व्यक्ती होती. परंतू, कालव्यामधे पाणी अत्यंत कमी असल्याने दोन्ही व्यक्ती बाहेर आल्या होत्या.
आज सकाळी दलाचे जवान पोहोचताच स्थानिक नागरिक व पोलिस यांच्यासमवेत क्रेनच्या साह्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले असून, सदर वाहनामधे कोणी ही जखमी किंवा कोणी अडकलेल्या स्थितीमधे असल्याचे आढळले नाही.