पुणे : पुण्यात कात्रज कोंढवा रोडवर बुधवारी सकाळी एक विचित्र घटना घडली आहे. वॉशिंग सेंटरवर टेम्पो घेऊन आल्यानंतर चालक टेम्पोच्या बाहेर उतरल्यानंतर टेम्पोत बसलेल्या तरुणांना चुकून रिवर्स टाकला. टेम्पो रिव्हर्स जाऊन थेट 40 फूट खोल विहिरीत पडला. या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून बाहेर काढले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोकुळ नगर येथील पुरंदर वॉशिंग सेंटर जवळ एक व्यक्ती पिकप टेम्पो सह विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली होती. दरम्यान दलाकडून कात्रज अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन तातडीने रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही व्यक्ती 40 फूट खोल विहिरीमध्ये पडली. असल्याचा दिसूनआला विहिरीतील एका दोरीला धरून ही व्यक्ती भेदरलेल्या अवस्थेत जवानांना दिसून आली. जवानांनी अथक परिश्रम करून विनोद पवार या 35 वर्षीय व्यक्तीला विहिरीच्या बाहेर काढलं.