धक्कादायक : पोलीस हवालदाराने पत्नीला ऑम्लेट बनवता येत नाही म्हणून केले असे कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना

792 0

पुणे : पुण्यातील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस हवलदार मनीष गौड यांन आपल्या पत्नीला ऑम्लेट बनवता येत नाही म्हणून तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. आई- वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी मुलगामध्ये पडला, पण त्याला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी या बापाने दिली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पोलीस हवालदार मनीष गौड यास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मनीष गौड हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असून आंबे बुद्रुक येथील दत्त विहार सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत.दरम्यान बुधवारी सकाळी सात वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना ऑम्लेट बनवून दिले. परंतु ते ऑम्लेट आवडले नाही म्हणून गौड पत्नीवर धावून गेले. तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागले. इलेक्ट्रॉनिक पक्कड देखील पत्नीच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. नंतर पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न देखील केला. आपल्या आईला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मध्ये पडला पण आपल्या मुलाला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी त्यास दिली.

याप्रकरणी गौड यांच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली असून गौड याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!