रेस्टोरंट सारखे फ्रेंच फ्राईज बनवण्याची योग्य पद्धत

281 0

अनेकांना फ्रेंच फ्राईज हा प्रकार खूप आवडतो. अगदी उपवासाला सुद्धा चालेल असा हा प्रकार नेमका घरी बनवला की मऊ पडतो. पण हॉटेलमध्ये मात्र तो छान लागतो. चला तर मग पाहूयात फ्रेंच फ्राईज बनवण्याची योग्य पद्धत…

तर मग सर्वात पहिले बटाटे स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर सोला आणि त्याला उभे काप द्या. हे काप खूप मोठेही करू नका आणि खूप पातळ देखील करू नका. यानंतर हे सर्व फ्रेंच फ्राईज स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवा. पाणी खळाखळ उकळले की यामध्ये हे सर्व फ्रेंच फ्राईज टाका. लक्षात ठेवा हे फ्रेंच फ्राईज पाण्यामध्ये घातल्यानंतर झाकायचे नाहीत, अगदी मोजून दोन ते तीन मिनिटे या गरम पाण्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज सोडायचे आहेत.

त्यानंतर हे पाणी उपसून घ्या आणि या फ्रेंच प्राईजवर कॉर्नफ्लॉवर भुरभुरून टाका. वाफवताना एक गोष्ट लक्षात घ्या बटाटे मऊ पडता कामा नयेत. त्यानंतर त्यांना डीप फ्रीजमध्ये तासभर ठेवा.

तळण्यापूर्वी यांना बाहेर काढा आणि कडकडीत तेलामध्ये यांना तळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा गॅस मोठा ठेवूनच यांना तळायचे आहे. आणि हलके गुलाबी झाल्यानंतर लगेच काढून घ्या. उपवास असेल तर नुसता मीठ घालून हे मस्त फ्रेंच फ्राईज खायला घ्या किंवा पेरी पेरी सॉस ,मसाला ,चाट मसाला ,तिखट यांबरोबर तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. या प्रोसिजरने फ्रेंच प्राईज केले तर ते मऊ पडत नाहीत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!