कृरतेचा कळस ; फावड्यानं चिरला गळा, पत्नीच्या हत्येनंतर देखील पतीच्या ‘त्या’ कृत्याने गावात संतापाची लाट

645 0

राग हा व्यक्तीच्या मनामध्ये साचत राहिला तर त्याचे केव्हा रुद्ररूप होऊन भडका होऊ शकतो हे सांगता येत नाही. पण कधी कधी काही घटना या मन सुन्न करून टाकतात. बारा बाकी जिल्ह्यातील जैनाबाद मजरे बबुरिहा हे छोटेसे गाव आहे. या गावांमध्ये अजय कुमार आणि वर्षा हे दाम्पत्य पंधरा वर्षापासून संसार करत होते. चार मुलांचा संसार सांभाळताना या दोघांमध्ये रोजच लहान-मोठ्या कारणाने वाद होत होते. पण त्या दिवशी झालेला वाद वर्षाचं आयुष्य संपून टाकणारा होता.

या दोघांमध्ये नक्की वाद कशावरून होत होते हे समजू शकले नाही. पण त्यादिवशी अजय कुमार घरी आला आणि वर्षा सोबत झालेल्या बाचाबाचीनंतर त्याचा संताप त्याला अनावर झाला. त्यानंतर त्याने वर्षा झोपली असताना तिच्यावर फावड्याने वार केले. हा वार तिच्या थेट गळ्यावर लागला आणि ती जागीच गतप्राण झाली.

पण हा संतापलेला नराधम तिथेच थांबणारा नव्हता आपल्या चार मुलांना जन्म दिलेल्या आपल्या पत्नीवरच तो पुढचे दहा मिनिटे फावड्याने सततवार करत राहिला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी अजय कुमार याला ताब्यात घेतल आहे.

दरम्यान पतीशी सातत्याने होणारे वाद मारहाण याची तक्रार वर्षाने तिच्या माहेरी देखील केली होती. परंतु संसार सांभाळून घेण्याचा सल्ला तिला तिच्या माहेरच्यांनी दिला. पण आज तिच्या माहेरच्यांना केवळ पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

Share This News
error: Content is protected !!