पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौक येथे संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मार्केट यार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीतील मागासवर्गीय व अल्पसंख्याकांची घरे दहशत व गुंडगिरीच्या जोरावर पाडण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यामध्ये भाजपच्या आमदार,स्थानिक नगरसेवक व आमदारांचा भाऊ व हे सर्व सहभागी होते .
तेथील बिल्डरच्या फायद्यासाठी हा सर्व उद्योग करण्यात येत होता. आश्चर्याची बाब आहे की एवढा सगळा प्रकार घडल्यानंतरही अद्यापही त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. सोशल माध्यमांवर सर्वत्र त्याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत.
संबंधित बिल्डर सह आमदार, नगरसेवक यांच्यावर कारवाई करावी व झोपडपट्टी वासियांना अधिकृतरित्या आहे त्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी या मागणीसाठी आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी अर्बन सेलचे पुणे शहर अध्यक्ष मा.नितीन भैया कदम तसेच राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुख व श्री दिनेश खराडे माहिती अधिकार सेल अध्यक्ष व तसेच महिला अध्यक्ष मृणालिनी ताई वाणी व माजी नगरसेवक सचिन पासलकर अर्जुन गांजे माजी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग या सर्वांनी आंदोलनास पाठिंबा देत आपले मते मांडली. याप्रसंगी स्थानिक जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.