‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ कडेच! भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

357 0

पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत.

नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.

“महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडे ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. 11 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जावी. या स्पर्धेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल.”

Share This News

Related Post

#MUMBAI : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे कर्तृत्वान महिलांना ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’; खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या…

#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

Posted by - February 2, 2023 0
पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने…

‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

Posted by - April 28, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही…
Kolhapur Crime

आईच्या मृत्यूची बातमी समजताच मुलानेदेखील रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

Posted by - June 17, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आईच्या मृत्यूची बातमी समजताच दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलाला…

Dr. Neelam Gorhe : “काँग्रेससोबत आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडले नाहीत…!”

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : सावरकरांना भारतरत्न मिळण्यासोबतच अनेक मुद्द्यावर शिवसेनेची स्वतःची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. असे असूनही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *