#LIFESTYLE : बॉडी डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा पर्याय ! शरीर आणि मनही राहील तंदुरुस्त…

875 0

तुमचं शरीर किती निरोगी आहे. यावरच तुमचं मन आणि मेंदू काम करत असते. जर तुमचं शरीर निरोगी नसेल तर तुम्हाला जाणवते की आपण जास्त काम करू शकत नाही. खूप सहज थकवा येतो, वाईट विचार मनात येतात, एकटे वाटते असं जर होत असेल तर तुमचं शरीर आधी तंदुरुस्त करा. त्यामुळे तुमचं मन आणि मेंदू दोन्हीही सकारात्मक विचार करेल.

सध्याची जीवनशैली पाहता फास्ट फूड, मद्यपान, धूम्रपान यामुळे शरीराचे बरच नुकसान होत असतं. पण मग आठवड्यातून फक्त हा एक उपाय केला तर तुमच्या पोटाचे बरेचसे विकार दूर होतील आणि पोट चांगले असेल तर तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याचा चांगला परिणामही दिसून येतो. तर मग काय करायचं वाचा…

यासाठी आठवड्यातून एक दिवस तुम्हाला ठरवायचा आहे. समजा शनिवारच्या रात्री एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला त्रिफळा चूर्ण एक चमचा मिक्स करायचे आहे आणि हे पाणी प्यायचे आहे.

या पाण्याची चव फार चांगली लागत नाही. परंतु शरीरावर याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. तर आजच या उपायाने शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी प्रयत्न करा, आणि तंदरुस्त राहा.

Share This News
error: Content is protected !!