#DRY DAY : पुण्यात पोटनिवडणुकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी

601 0

                             उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द होण्याची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या २ मार्च २०२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

पुणे जिल्ह्यातील चिंचवड’ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत व मतदार संघात सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या कालावधीत निवडणूक निर्वाचण कार्यक्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पक्षांतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी सरसावले मुरलीधर मोहोळ; पक्षातील ‘या’ नाराज नेत्यांच्या घेतल्या भेटी

Posted by - March 18, 2024 0
पुणे : पुणे शहरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचाराला सुरुवात केली…

FLASHBACK 2022: ‘या’ आहेत 2022 मधील मोठ्या राजकीय घटना

Posted by - December 29, 2022 0
महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 हे वर्ष प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं. शिवसेनेची दोन शकलं करणारं सर्वांत मोठं राजकीय बंड याच वर्षात घडलं…

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Posted by - November 14, 2022 0
गुजरात : गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना…

इंग्रजांच्या गुलामीत खितपत भारतास ‘प्रजासत्ताक’ बनवण्यात यशस्वी नेतृत्व दिल्यानेच महात्मा गांधी जननायक-  गोपाळ तिवारी

Posted by - July 24, 2022 0
पुणे:गुलामीच्या पारतंत्र्यातील खितपत देशास ‘भारतीय प्रजासत्ताक’ अर्थात प्रजेची लोकशाहीरुपी-सत्ता बनवण्याचे महत् कार्य गांधींनी ‘सत्य व अहिंसेच्या’ तत्वांवर केल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचे ते…

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022 0
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *