जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव महिला आयोगाच्या कचाट्यात; महिला आयोग म्हणते हा गुन्हा आहे…! वाचा सविस्तर

831 0

पुणे : अकलूज मधील अजब गजब लग्नामुळे महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. अतुल याने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींशी एक साथ लग्न केलं. कारण या दोघी बहिणी एकमेकांपासून वेगळं राहू शकत नाही. जन्म , खेळणे , शिक्षण आणि नोकरी देखील या बहिणींनी एक साथ केली. आजारपणामध्ये दोघी बहिणी आणि आईला आधार देणाऱ्या अतुलवर या दोघींपैकी एकीचं प्रेम जडलं पण एकीच लग्न केलं तर दोघींमध्ये दुरावा येईल म्हणून या जुळ्या बहिणींनी अतुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अजब प्रेम गजब लग्न : अकलूजमध्ये जुळ्या बहिणींनी केल एकाच युवकाशी लग्न; म्हणे कारण कि… आता झाला गुन्हा दाखल !

त्यानंतर अकलूजमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. पण आता थेट महिला आयोगाने देखील दखल घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कारवाई बाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!