नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षावर अनेक गाम्भी आरोप केले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणले कि, नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता.
माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही यावेळी सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.