नव्या शैक्षणिक धोरणाचा चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीसाठी उपयोग व्हावा-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

432 0

पुणे- नवे शैक्षणिक धोरण राबविण्यामध्ये खासगी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार असून त्यांनी या धोरणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न समाजाच्या निर्मितीमध्ये सहभाग नोंदवावा. शैक्षणिक धोरणानुसार समग्र, व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठीत, दिशादर्शक आणि मानवनिर्माण करणारे शिक्षण उपलब्ध करुन दिले जावे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने हयात रिजेन्सी येथे ‘एनईपी २०२०: प्रभावी अंमलबजावणीसाठी खासगी क्षेत्राची भूमिका’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, ‘इपीएसआय’चे अध्यक्ष तथा वेल्लूर येथील व्हीआयटी विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. जी. विश्वनाथन, बंगलोर येथील एम. एस. रमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. एम. आर. जयराम, ग्रेटर नोएडा येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. एच. चतुर्वेदी, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कोईम्बतूर येथील श्री कृष्णा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा एस. मलारवेझी आदींसह शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, खासगी क्षेत्रातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. इंग्रजी भाषासोबतच स्थानिक भाषांमधून सर्व प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जावे. शिक्षणाचा सम्रग दृष्टीकोन असावा. रोजागाराभिमूख शिक्षणास उद्योजक तयार करणारे शिक्षण द्यावे. ‘लोकल टू ग्लोबल’ शिक्षण पद्धती असावी. राष्ट्रीय शिक्षण धोरण शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य अशा राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा. सहस्त्रबुद्धे म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खासगी क्षेत्र आणि सरकार यांच्या समन्वयातून काम होत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास आणि त्यांना विविध विद्याशाखेतून शिक्षण घेता यावे यासाठी हे धोरण महत्वाचे आहे”

डॉ. विश्वनाथऩ म्हणाले, “ईपीएसआय ही संस्था गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जागतिक स्तरावरील शिक्षण भारतात उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले”.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यातील मावळ-हवेलीतील 6 बड्या ‘प्लॉट डेव्हलपर’वर गुन्हे दाखल

Posted by - April 12, 2022 0
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि हवेली तालुक्यात अनधिकृत प्लॉटींग करुन जागामालक व विकसक हे विक्री, विकसनाचे काम करत असल्याचे पुणे महानगर…

टीईटी परीक्षा घोटाळा; अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास

Posted by - January 28, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे…

पिंपरी चिंचवड हादरले ! मंगळवारी हवेत गोळीबार करणारे तीन आरोपी पिंपरी पोलिसांच्या जाळ्यात; असे शोधले आरोपी

Posted by - December 7, 2022 0
पिंपरी चिंचवड : मंगळवारी सायंकाळी चिंचवड येथील पत्रा शेड तसेच पिंपरी येथील भाटनगर परिसरात तीन आरोपींनी हवेत गोळीबार केला. यावेळी…

बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित, पाहा ट्रेलर

Posted by - March 25, 2022 0
मुंबई- एसएस राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ हा चित्रपट आज, २५ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक सिनेप्रेमी ज्याची आतुरतेने वाट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *