#BEED : ‘जो आडवा आला त्याला जेसीबीच्या खाली घ्या’, मुजोर अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

794 0

बीड : बीड मधून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून शासकीय अधिकाऱ्याने गावकऱ्याच्या अंगावर जेसीबी घालण्याची धमकी दिली आहे. हा गंभीर प्रकार धारूर तालुक्यातील महावीर मोहा येथील रस्त्याचे काम सुरू असते वेळी घडला.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, धारूर तालुक्यातील जहागीर मोहा या ठिकाणी रस्त्याचे कामकाज सुरू आहे. हे काम चांगलं करावं यासाठी गावकऱ्यांनी मागणी केली होती. दरम्यान या गावकऱ्यांनाच शाखा अभियंता मुजाहिद सय्यद यांनी दम भरल्याचा या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आडवा येणाऱ्याला जेसीबी खाली घेऊ अशी धमकी देखील दिल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला असल्याचा समजत आहे.

या मुजोर अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावं अशी मागणी या गावकऱ्यांनी केली असून गावकरी आक्रमक झाले आहेत. त्यातच या अधिकाऱ्याचा धमकी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

Share This News
error: Content is protected !!