बसमध्ये झाली मैत्री; पुस्तक खरेदीच्या बाहण्याने पोहोचले पुण्यात; आरोपीने कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला, तरुणीची 16 लाखाची फसवणूक

523 0

पुणे : पुण्यात रोजच अत्याचार, बलात्कार फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येत असतात. सांगलीतील तरुणी बरोबर असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

सांगलीतून बसने पुण्याकडे येत असताना तिची एका फहीम नवीन सय्यद याच्याशी ओळख झाली. या तरुणाने गोड बोलून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर पुण्याला पुस्तक खरेदीच्या बाहाण्याने आले असता पुस्तक खरेदी केल्यानंतर तिला जेवणासाठी म्हणून हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे कोल्ड्रिंक मधून तिला गुंगीचे औषध पाजले.

यानंतर बालगंधर्व चौकातील विजय लॉजमध्ये तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने या आरोपीला तब्बल 16 लाख 86 हजार रुपये दिले असल्याचं समजतंय. त्यानंतर देखील या आरोपीने पैशांची मागणी थांबवली नाही. त्यामुळे अखेर या पिडीतेने पोलिसांमध्ये धाव घेतली.

पोलिसांनी तात्काळ फहीम सय्यद याला अटक केली असून त्याची कोणतीही ट्रॅव्हल्स एजन्सी नसून तो केवळ एका एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News

Related Post

#NEWS DELHI : आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या नव्या महापौर

Posted by - February 22, 2023 0
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर बुधवारी दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी…

राजकारणातला सिंघम गेला दीपक पायगुडे यांची भावनिक पोस्ट

Posted by - October 27, 2022 0
पुणे : माझे अत्यंत जवळचे मित्र, वडीलबंधू माजी आमदार विनायकशेठ निम्हण यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अगदी सुन्न झालं; अजूनही…

अंधश्रद्धेचा कळस ; मध्यप्रदेशातील शहडोलमध्ये आजारी चिमुकलीला 24 वेळा गरम सळईने दिले चटके, 3 दिवसांत कुप्रथेची दुसरी बळी

Posted by - February 4, 2023 0
मध्य प्रदेश : शहडोल, जे.एन. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नुकतीच शहडोलमध्ये एका निष्पाप मुलीचा…
Raigad Accident

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Posted by - December 30, 2023 0
रायगड : रायगडमधून (Raigad Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी…
Tushar Doshi

Jalna News : जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाई

Posted by - September 3, 2023 0
जालना : जालन्यात (Jalna News) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *