भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का

246 0

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा दणका बसला असून भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. 

काय आहे प्रकरण ?

मागील वर्षी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत ठराव मांडण्यात आला होता. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत हा ठराव होता. या ठरावाला भाजप आमदारांनी जोरदार विरोध केला. यावेळी भाजपच्या काही आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी विधानसभा अध्यक्षांनी वर्षभरासाठी निलंबन केले होते. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटले होते.

निलंबित केलेले आमदार 

आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)

अभिमन्यू पवार (औसा)

गिरीश महाजन (जामनेर)

पराग अळवणी (विलेपार्ले)

अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)

संजय कुटे (जामोद, जळगाव)

योगेश सागर (चारकोप)

हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)

जयकुमार रावल (सिंधखेड)

राम सातपुते (माळशिरस)

नारायण कुचे (बदनपूर, जालना)

बंटी भांगडिया (चिमूर)

Share This News

Related Post

आजच्या नाश्त्यासाठी खास रेसिपी; हिवाळ्यामध्ये भरपूर एनर्जी आणि प्रोटीनयुक्त ‘डाळींचा डोसा’

Posted by - December 9, 2022 0
हिवाळ्यामध्ये भरपूर एनर्जी आणि प्रोटीनयुक्त आहार शरीराला मिळणे आवश्यक असते. यासाठी गृहिणी अनेक पदार्थ बनावट असतात. त्यात हा डाळींपासून बनवलेला…
Loksabha Election

Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून ‘हे’ 11 शिलेदार जवळपास निश्चित

Posted by - February 8, 2024 0
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी (Loksabha Election) जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार…

पुणे येथे १३ ते १५ मार्च या कालावधीत तांदूळ महोत्सव ; अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Posted by - March 10, 2022 0
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, आंबेमोहर व स्थानिक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्ये आदी शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट शहरातील…
Corona News

Corona News : कोरोना परत आला ! ‘या’ जिल्ह्यात आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

Posted by - September 25, 2023 0
सांगली : 2-3 वर्षांपूर्वी कोरोनाने (Corona News) महाराष्ट्रासह संपूर्ण जगात थैमान घातले होते. त्यामुळे लोकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.…

UPDATES : ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु !

Posted by - January 20, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगासमोर आज चार वाजता ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? या महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होते आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *