पुणे : जिल्ह्यात ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

456 0

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मे. नटराज पान दुकान, भाजीपाला बाजार, हडपसर, शरणअप्पा बेलुरे यांचे सुंदर कॉलनी, पवार नगर, थेरगाव येथील निवासस्थान, मे. भगवानबाबा पान दुकान, कोंढवा बु. मे. प्रिया पान स्टॉल, चिंचवड स्टेशन, चिंचवड या चार ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ४१ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या चार जणांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली आहे.

गार्णीश पान दुकान, त्रिमूर्ती चौक, धनकवडी आणि मे. न्यु जयनाथ पान दुकान, आंबेगाव, पुणे या दोन ठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ९ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!