पुणे : जिल्ह्यात ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

369 0

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मे. नटराज पान दुकान, भाजीपाला बाजार, हडपसर, शरणअप्पा बेलुरे यांचे सुंदर कॉलनी, पवार नगर, थेरगाव येथील निवासस्थान, मे. भगवानबाबा पान दुकान, कोंढवा बु. मे. प्रिया पान स्टॉल, चिंचवड स्टेशन, चिंचवड या चार ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ४१ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या चार जणांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली आहे.

गार्णीश पान दुकान, त्रिमूर्ती चौक, धनकवडी आणि मे. न्यु जयनाथ पान दुकान, आंबेगाव, पुणे या दोन ठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ९ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला…

उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखासह 6 जणांना अटक

Posted by - August 3, 2022 0
उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना…

पुणे शहरात पावसाची संततधार; 10 ठिकाणी घडल्या झाडपडीच्या घटना

Posted by - September 16, 2022 0
पुणे: पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून आज सकाळपासूनच संपूर्ण पुणे शहरात पावसाची संततधार सुरू असून पुण्याला पाणीपुरवठा…
ST Bus Accident

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Posted by - November 22, 2023 0
सोलापूर : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. सध्या सोलापूर -तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात (ST…
Hingoli Accident

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2024 0
हिंगोली : हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची (Hingoli Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकल्याने भीषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *