Gold Scheme

Gold Scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

860 0

आजपासून स्वस्त सोने खरेदी (Gold Scheme) करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) अंतर्गत आजपासून 23 जून पर्यंत सोने खरेदी (Gold Scheme) करता येणार आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे अंतर्गत गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक म्हणजेच 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक केली जाते.

किती असेल सोन्याची किंमत ?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे अंतर्गत एक ग्राम सोन्यासाठी 5,926 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने सोने खरेदी करता येणार असून प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता फक्त 5876 रुपये मोजावे लागणार आहेत. आपण एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्राम आणि जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत गुंतवणूक करू शकता.

ऑनलाईन खरेदीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळणार
डिजिटल माध्यमातून सुवर्ण रोखेसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शनची किंमत 50 रुपये प्रतिग्रॅमने कमी असणार आहे. गुंतवणूक करणाऱ्याना सहामाही आधारावर वार्षिक वार्षिक 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे.

किती असेल सार्वभौम सुवर्ण रोखेचा कालावधी ?
सार्वभौम सुवर्ण रोखेचा कालावधी हा 8 वर्षाचा असणार आहे. तर 5 वर्षानंतर गुतंवणूकदारांना त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. या बॉंड्सचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षाचा असणार आहे.

सार्वभौम सुवर्ण रोखे कोठे खरेदी करणार?
आपण सोने हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड( SHCIL) , मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, पोस्ट ऑफिस , BSE आणि NSE द्वारे खरेदी करू शकता.

गुंतवणूक कोण करू शकणार ?
सार्वभौम सुवर्ण रोखेची गुंतवणूक भारतीय निवासी व्यक्ती , ट्रस्ट , विद्यापीठे , धर्मादाय संस्था , हिंदू अविभक्त कुटुंबे आदी करू शकतात.एका वर्षात वैयक्तिक गुंतवणूकदार जास्तीत जास्त 4 किलो तर ट्रस्ट किंवा संस्था 20 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.

Share This News
error: Content is protected !!