मुंबई : मनोरंजन सृष्टीतून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे सोमवारी निधन (Pass Away) झाले आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या. शांता तांबे (Shanta Tambe) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण केली होती. शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करुन अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकात त्यांनी काम केले होते.
Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी
अभिनेत्री शांता तांबे यांची कारकीर्द
अभिनेत्री शांता तांबे यांनी भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar), दिनकर पाटील (Dinkar D. Patil), अनंत माने (Anant Mane) आदी दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले. मोहित्यांची मंजुळा (Mohityanchi Manjula), सवाल माझा ऐका (Sawaal Majha Aika), मोलकरीण (Molkarin), बाई मोठी भाग्याची (Bai Mothi Bhagyachi), मर्दानी (Mardaani) अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. दोन बायका फजिती ऐका (Don Baika Phajeeti Aika), चांडाळ चौकडी (Chandaal Chowkadi ), असला नवरा नको गं बाई (Asla Navra Nako Ga Bai), सोंगाड्या, चंदनाची चोळी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजली होती.
Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू
शांता तांबे यांनी 7 दशकं त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवलं. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतला. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jiv Rangla) या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती.