बिग बॉस फेम आणि भाजपने त्या सोनाली फोगाट यांचा अचानक मृत्यू झाला . हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 41 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने चहात्यांना धक्का बसला. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बहिणीने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला . त्यानंतर पोलिसांनी देखील तपासाची सूत्रे फिरवली . दरम्यान सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवाने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं गोवा पोलिसांनी सांगितला आहे.
गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सागवान याला शुक्रवारी ताब्यात घेतलं . दरम्यान अधिक चौकशी केली असता त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून त्यांना ड्रग्स देण्यात आले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावला . या गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे.
#SonaliDeathMystery. Goa IG says, she was forcefully given some obnoxious chemical . Sudhir the accused gave her this substance, Later she died. #SonaliPhoghat #SonaliPhoghatdeath #Goa pic.twitter.com/x0QjdQo9fj
— Isha sharma (@Isha74342320) August 26, 2022
घटनेच्या आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील गुन्ह्याचे धागेदोरे सापडण्यास मोठी मदत झाली. या फुटेजमध्ये दोन्हीही संशयित आरोपी पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर हे पार्टी करत असतानाचे दिसून येत आहेत. तर या दोघांनी सोनाली यांना जबरदस्तीने काहीतरी पाजण्याचा प्रयत्न केला असल्याच देखील दिसून येत आहे. दरम्यान सोनाली यांचा मृत्यू हृदयविकारान नाही तर ड्रग्स ओवर डोसने झाला असल्याचं गोवा पोलिसांनी म्हटल आहे.