पुणे : बांधकाम प्रकल्पात खोदकाम केल्यानंतर सापडलेला खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उडालेले दगड लागून एका बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक बांधकाम मजूर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे.
खराडी भागात प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कडून बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू असताना खड्ड्यात सुरुंग लावण्यात आला होता. यावेळी सुरुंगाचा स्फोट झाला. त्यानंतर दगड उडाले आणि यातील एक बांधकामजूर शेख याच्या डोक्याला दगड लागल्याने उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर मनू चौधरी नावाच्या बांधकाम मजुराला हातावर दगड लागला आहे.
याप्रकरणी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणात तसेच बांधकाम मजुरांना सुरक्षा विषयक साहित्य न पुरवल्याने दुर्घटना घडली असल्याकारणाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.