धक्कादायक : पुण्यातील डेक्कन येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये धगधगत्या चिते समोर आघोरी कृत्य; काळ्या रंगाच्या बाहुल्या, लोकांचे फोटो, सुया आणि…

695 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेक्कन येथील वैकुंठ स्मशानभूमी मध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आघोरी कृत्य करताना दोन तृतीय पंथीयांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये लक्ष्मी निमाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीमध्ये रात्री उशिरा एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळाने हे दोन तृतीयपंथीय आरोपी या चिते जवळ आले आणि या दोघांनी धगधगत्याची चीते समोरच आघोरी कृत्य करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या काळ्या बाहुल्या, लिंबू, सुया हळदीकुंकू आणि काही लोकांचे फोटो सापडून आले आहेत. ही घटना स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, आणि त्याने वेळेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोन्हीही तृतीय पंथी आरोपींना ताब्यात घेतलं.

या दोन्हीही आरोपींच्या विरोधात नरबळी आणि इतर अमानुष आघोरी दुष्कर प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!