उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत असून, दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. दरम्यान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यात्रेला अल्पविराम घ्यावा लागत आहे अशी माहिती महाप्रबोधन यात्रा या अधिकृत फेसबुक पेजवरून देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र,
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या, संघर्ष आले, विरोधकांची कानउघडणी झाली तर निष्ठावंतांची साथ मिळाली. महाराष्ट्रातून भरभरून विश्वास ह्या यात्रेला मिळत आहे. पण खेद आहे, की दि. 20/12/2022 पर्यंत आपल्या महाप्रबोधन यात्रेला अल्पविराम घ्यावा लागत आहे. आपल्या महाप्रबोधन यात्रेचा हुंकार असणाऱ्या आपल्या शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे ह्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाप्रबोधनाचा हा झंझावात काही काळ विराम घेत आहे. ह्याचा आम्हा,तुम्हाला खेद तर विरोधकांना मात्र दिलासा आहे. पण दि. 20/12/2022 नंतर विरोधकांनी पुन्हा तयार रहा, आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला.
भेटू दि. 20/12/2022 नंतर..
जय महाराष्ट्र.