मोठा निर्णय : राज्यातील ‘त्या’ 2 महत्त्वाच्या केसेस CBI कडे वर्ग करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे निर्देश ; पोलीस अधिकारी आणि काही मोठे राजकीय नेते CBI च्या रडारवर

215 0

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. तर अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील दोन महत्त्वाच्या केसेस सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश गृह विभागाने पोलिसांना दिले असल्याची माहिती समोर येते आहे. यामध्ये गिरीश महाजन खंडणी आणि गुन्हेगारी कट प्रकरण त्यासह पुण्यातील फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतर 28 जणांविरुद्ध खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही पोलीस अधिकारी आणि मोठे राजकीय नेते देखील सीबीआयच्या रडारवर असल्याचे समजते.

Pune police book BJP's Girish Mahajan on extortion & 17 other charges |  Pune News - Times of India

तर फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसात दाखल गुन्हा देखील सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणात गुन्हे शाखेच्या तात्कालीन पोलीस उपायुक्तांची पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली होती.

Pune Phone Tapping Case | पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला...

तात्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. चौकशी करण्यात आलेले पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.

Share This News
error: Content is protected !!