एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती-शरद पवार

166 0

पुणे: आमचे नेते एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा दिली नव्हती असा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता.

यावरून बरेच आरोप प्रात्यारोप झाले आहेत. त्यानंतर शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

शरद पवार आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
शरद पवार म्हणालेसुरक्षा कुणाला द्यायची आणि का द्यायची हा निर्णय घेण्यासाठी राज्याचा मुख्य सचिव, आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती असते ते निर्णय घेत असतात. आज माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. असं पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही छातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि दिल्लीतून निर्णय आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, “त्यांनी दगड छातीवर ठेवू की डोक्यावर ठेवू आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.असं शरद पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना पवार म्हणाले की, राज्याची सत्ता त्या दोघांनीच चालवायचं ठरवलं दिसतंय आणि त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे. ते आता सत्ताधारी आहेत म्हणून साहजिकच ते जे काय करतील ते आपल्याला स्विकारावं लागेल.असं मत व्यक्त करत शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरेंच्या आदेशानंतर घाटकोपरमध्ये हनुमान चालिसा सुरू

Posted by - April 3, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदीवरील  बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता.…
EVM

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

Posted by - May 12, 2024 0
पुणे : उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी तब्बल 23 हजार…
Loksabha Election

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी (Loksabha Election) पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून पहिल्या उमदेवार यादीत 8…

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात प्रती लीटर 20 रुपयांची कपात

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात…
Rahul Eknath And Uddhav

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shiv Sena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *