“शरद पवार सगळ्या राजकारण्यांना गुण देतात मी देखील आज गुण घेतला” किरीट सोमय्यांनी केले शरद पवारांचे कौतुक !

228 0

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. शरद पवार हे गिरीश बापट यांच्या भेटीसाठी जात असतांना भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे देखील रुग्णालयात पोहचले होते. शरद पवार आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांना नमस्कार केला आणि दोन्हीही गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले. 

यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले कि, “गिरीश बापट यांची प्रकृती पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. शरद पवार साहेब हे येणार आहेत म्हणून मी थांबलो होती, शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे त्यांचे नेहमीच आम्ही आदर करतो. शरद पवार यांच्या कडून सगळ्या राजकारण्यांनी एक गुण घेण्यासारखा आहे. मी देखील त्यांच्याकडून एक गुण घेतला आहे, पवार साहेब यांनी बापट साहेब बद्दल खूप विचारपूस केली.

आम्ही आत गेलो, बापट पेरू खात होते आणि लगेच शरद पवार यांनी पेरुवर चर्चा केली, गिरीश बापट यांना शरद पवार म्हणले लवकर संसदेत या असं किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. याशिवाय माध्यम प्रतिनिधी यांनी तुम्हाला पवार साहेब म्हणाले का ? संसदेत या असं असं विचारले त्यावर सोमय्या यांनी माझं काम मी केलं. यांचे सरकार घरी बसवले आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!