Beed:

खळबळजनक : पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण विशेष शाखेच्या जाळ्यात; बनावट भारतीय पारपत्र जप्त

2474 0

पुणे : पुण्यातून आज बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेनं पकडल आहे. महंमद अमान अन्सारी (वय वर्ष 22) असे अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारी विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक बनावट शासकीय कागदपत्र तयार करणे तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, एक पाकिस्तानी नागरिक शहरात बेकायदा वास्तव्य करीत असल्याचं समजल्यानंतर विशेष शाखेनं त्यास भवानी पेठ येथील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेतलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून भारतीय पारपत्र आढळून आले आहे. हे बनावट कागदपत्राद्वारे तयार करण्यात आले असून अन्सारीला बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान बेकायदा वास्तव्य करण्यामागे नेमका अन्सारीचा हेतू काय होता. त्याचबरोबर तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे का ? या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!