‘आरटीई’ साठी सोमवारपासून शाळा नोंदणी सुरू; आरटीई अंतर्गत 25% जागा दुर्बल घटकांसाठी राखीव ! कोणकोणती कागदपत्रं आवश्यक ?

920 0

शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25% जागांसाठीची शाळा नोंदणीची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करणं बंधनकारक आहे.

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. ‘आरटीई’ प्रवेशाच्या प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची वाट राज्यातील पालक पाहत असतात.

जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची राहणार आहे. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालकांना आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पालकांना अर्ज करता येण्याची शक्यता आहे.

शाळेतील पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश मिळालेले असल्यास अशा शाळांची नोंदणी प्रवेश प्रक्रियेत करता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्या खासगी शाळांचाही तीन वर्षांपर्यंत या प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत पाहूयात

निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड,

ड्रायव्हिंग लायसन्स,

वीज किंवा टेलिफोन बिल,

प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी आधारकार्ड,

मतदान ओळखपत्र पासपोर्ट,

सरकारी बँकेचे पासबुक 

भाडेकरार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. यावेळी पत्त्यावर मूल किंवा पालक राहत नसल्याचं आढळल्यास प्रवेश रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जन्मतारखेचा पुरावा

उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप, तहसीलदाराचा दाखला

जात प्रमाणपत्र पुरावा दाखला

दिव्यांग मुलांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच वैद्यकीय प्रमाणपत्र

Share This News
error: Content is protected !!