पुणे- गुढीपाडव्या दिवशी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या घोषणेमुळं राजकीय अडचण होत असल्याची खदखद पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून जाहीरपणे मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची अडचण होत आहे. वसंत मोरेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या युवा नेत्यानं त्यांचं अभिनंदन केलं आहे. मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करुन लोकशाहीला साजेसं काम केलं असल्याचे काँग्रेसचे युवा नेते आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.