संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप नेत्यांची दिल्लीकडे कूच

179 0

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असल्याचे काल, सोमवारी जाहीर केले होते. आज संध्याकाळी 4 वाजता संजय राऊत शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. पण त्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी दिल्लीकडे प्रयाण केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राऊत यांच्या पत्रकार परिषदेला अवघे दोन तास बाकी असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. बर्दाश्त बहोत किया अब बर्बाद करेंगे असं राऊतांनी सुनावलं होतं. त्यामुळे राऊत यांच्या पीसीपूर्वीच भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

दिल्ली भेटीत चंद्रकांत पाटील आणि सोमय्या हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राऊत यांनी राज्यातील किंवा केंद्रातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यास पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन हे दोन्ही नेते दिल्लीतील नेत्यांकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाटील आणि सोमय्या यांच्या या दिल्लीवारीमध्ये नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत हे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधूनही शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना भवना समोर दाखल झाले आहेत. सेनाभवनावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सेनाभवनाला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचे लाइव्ह टेलिकास्ट सर्वांना दिसावे यासाठी सेनाभवनाबाहेर एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

MVA Loksabha Formula

महाविकास आघाडीचं मुंबईतील जागावाटप ठरलं?; पाहा कोणता पक्ष किती जागा लढवणार?

Posted by - August 25, 2024 0
नुकतीच महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईच्या जागा वाटपावर चर्चा झाली असून मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ ठरण्याची…

Leopard Hunting : बिबट्याची शिकार करुन फार्महाऊसमध्ये लपवले अवयव; 2 बड्या उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - August 21, 2023 0
पुणे : बिबट्या या वन्य प्राण्याची शिकार (Leopard Hunting) करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये (Leopard…

डॉ. नरेंद्र दाभोलकर वार्ता संकलन प्रदर्शन : सद्यपरिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विवेकवादी विचार पोहचविण्याची गरज- डॉ. श्रीपाल सबनीस

Posted by - August 20, 2022 0
पुणे : सध्या माथेफिरु वाढलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाट्याला आले त्यापेक्षा हजार पटीने धर्मांध माणसे आणि धर्मांधता वाढली…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन*

Posted by - July 1, 2022 0
मुंबई: भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *