महत्वाची बातमी ! चारा घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

137 0

नवी दिल्ली- तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित चार घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दोरांडा कोषागारातून अवैधरित्या 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावणार असून लालूप्रसाद यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावे लागणार हे पाहावे लागणार आहे.

चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या प्रकरणात रांची इथल्या विशेष CBI न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राजेंद्र पांडे, साकेत लाल, दीनानाथ सहाय, राम सेवक साहू, ऐनुल हक, सनौल हक, अनिल कुमार यांची दोरांडा प्रकरणात पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे.

यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये सुमारे 27 वर्षांची शिक्षा झाली होती. यासोबतच त्यांना एक कोटींचा दंडही ठोठावण्यात आला होता. सध्या लालू यादव जामिनावर बाहेर आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित यापूर्वीच्या खटल्यांमध्ये लालूंना पाच ते सात वर्षांची शिक्षा झाली होती . त्यानंतर उच्च न्यायालयाकडून दुमका प्रकरणात दिलासा मिळाल्यामुळे लालू सध्या तुरुंगाबाहेर आहेत.

या खटल्यात 7 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला , ज्यामध्ये एकूण 575 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले . तर बचाव पक्षाच्या वतीने 29 जानेवारी रोजी 110 आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला . लालू प्रसाद यांचाही यात समावेश आहे . बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत, तर लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.

Share This News

Related Post

पिंपरी महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा

Posted by - March 4, 2022 0
पिंपरी- महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागाच्या…

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार अल्ताफ मोहम्मद शेख आणि टोळीतील चार जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - October 8, 2022 0
पुणे : खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखा वरील आरोपी अल्ताफ मोहम्मद शेख वय वर्षे 20 आणि त्याच्या टोळीतील चार साथीदारांवर…

मशिदीवरचे भोंगे बंद होत नसतील तर हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे

Posted by - April 2, 2022 0
मी अयोध्येला जाणार आहे, पण तारीख अद्याप निश्चित झाली नाही. आपण जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार…

TOP NEWS SPECIAL REPORT : लोकवर्गणीतून आमदार, खासदार झालेला लोकनेता ‘राजू शेट्टी’…!

Posted by - September 15, 2022 0
TOP NEWS SPECIAL REPORT : राजू शेट्टी महाराष्ट्राच्या राजकारणातील विशेषतः शेतकरी चळवळीतील मोठं नाव आंदोलन असो वा मोर्चे राजू शेट्टी…

नीती आयोगाचे सदस्य व शास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार सारस्वत यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सिफोरआयफोर लॅब ला भेट

Posted by - July 13, 2022 0
पुणे ऑटोमेशन तंत्रज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचायला हवी असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *